धक्कादायक! सूड उगवण्यासाठी मोठ्या बहिणीने घडवून आणला सख्ख्या लहान बहिणींवर गॅंगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 10:06 IST2021-06-07T10:05:24+5:302021-06-07T10:06:50+5:30

गॅंगरेप प्रकरणी पीडित दोन्ही बहिणींच्या मोठ्या बहिणीसह दोघांना अटक करण्यात आली आहे. बहिणीनेच आपल्या सख्ख्या बहिणीचा गॅंगरेप घडवून आल्याचा खुलासा झाल्यावर सगळेच हैराण झाले.

Shocking! Two minor sisters faced gangrape by boyfriend of elder sister for revenge arrested in Jaipur | धक्कादायक! सूड उगवण्यासाठी मोठ्या बहिणीने घडवून आणला सख्ख्या लहान बहिणींवर गॅंगरेप

धक्कादायक! सूड उगवण्यासाठी मोठ्या बहिणीने घडवून आणला सख्ख्या लहान बहिणींवर गॅंगरेप

दररोज देशभरात गॅंगरेपच्या संतापजनक घटना समोर येत असतात. मात्र, राजस्थानच्या जयपूरमधून गॅंगरेपची (Gangrape in Jaipur) एक फारच विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका मोठ्या बहिणीने आपल्या २ अल्पवयीन बहिणींचा गॅंगरेप (Two sister gang raped) घडवून आणला. कारण त्या तिला साथ देत नव्हत्या. हे प्रकरण समोर आल्यावर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

गॅंगरेपची ही खळबळजनक घटना जयपूरच्या प्रताप नगरमधील आहे. २ मे रोजी दोन सख्ख्या बहिणींचा गॅंगरेप झाला होता. याप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी कारवाई करत ६ लोकांना गॅंगरेप प्रकरणी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ अल्पवयीन आरोपी आहे. 

पोलिसांनुसार, गॅंगरेप प्रकरणी पीडित दोन्ही बहिणींच्या मोठ्या बहिणीसह दोघांना अटक करण्यात आली आहे. बहिणीनेच आपल्या सख्ख्या बहिणीचा गॅंगरेप घडवून आल्याचा खुलासा झाल्यावर सगळेच हैराण झाले.आरोपीमध्ये दयाराम, रविंद्र मीणा आणि दोन्ही बहिणींची मोठी बहीण यांचा समावेश आहे. (हे पण वाचा : घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार)

पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, सख्ख्या बहिणीचा दोन्ही लहान बहिणीसोबत वाद सुरू होता. दोन्ही अल्पवयीन बहिणींनी आपल्या मोठ्या बहिणीला तिच्या बॉयफ्रेन्डसोबत राहण्याला विरोध दर्शवला होता. याच कारणावरून मनात राग असलेल्या मोठ्या बहिणीने आपल्या बॉयफ्रेन्डसोबत मिळून हे संतापजनक कृत्य केलं. 

त्यांनी केलेल्या प्लॅननुसार, मोठ्या बहिणीच्या बॉयफ्रेन्डने आपल्या साथीदारांसोबत मिळून आधी दोन बहिणींचं अपहरण केलं आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्यावर गॅंगरेप केला. यानंतर नराधमांनी दोन्ही बहिणींना बसस्टॉपवर सोडून ते तेथून फरार झाले.

घटनेनंतर दोन्ही पीडितांनी प्रताप नगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. पोलीस प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.   
 

 

Web Title: Shocking! Two minor sisters faced gangrape by boyfriend of elder sister for revenge arrested in Jaipur