धक्कादायक! पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 18:47 IST2019-05-30T18:46:06+5:302019-05-30T18:47:48+5:30

पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

Shocking Suicide of husband and wife | धक्कादायक! पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या 

धक्कादायक! पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या 

ठळक मुद्देरोशनी व सुनिल या दोघांनी मृत्युपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

वाशिम - येथील देवपेठ परिसरात वास्तव्य करणारे रोशनी (वय २३) व सुनिल जाधव (वय २६) या दाम्पत्यांनी बुधवारी (दि. ३०) रात्री १२:३० वाजताचे सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. 
चुरमुरा (ता.उमरखेड) येथील सुनिल जाधव हा वाशिम येथे रोजगारानिमित्त वास्तव्यास होता. सुनिल याचा विवाह पुसद येथील रोशनी हिचेसोबत तीन वर्षापुर्वी पार पडला. त्यांना अडीच वर्षाची मुलगी आहे. सुनिल व रोशनी यांचेसोबत रोशनी हिची बहिन मुन्नी शिक्षणानिमित्त त्यांच्या घरामध्ये वास्तव्य करीत होती. ३० मे रोजी रात्री १२:३० चे सुमारास मुन्नी हिला लहान मुलगी रडण्याचा आवाज आल्याने तिने आपल्या बहिनीच्या शयनकक्षामध्ये डोकाऊन बघितले. यावेळी मुन्नी हिला आपली बहिण रोशनी व मेहुणा सुनिल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. 
मुन्नी हिने या घटनेची माहिती तात्काळ शेजाऱ्यांना व पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. रोशनी व सुनिल या दोघांनी मृत्युपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. यामध्ये आपल्या लहान मुलीचा सांभाळ वडिलांनी करावा असा उल्लेख आहे. या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: Shocking Suicide of husband and wife