धक्कादायक! तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 14:08 IST2019-09-30T14:06:35+5:302019-09-30T14:08:02+5:30
कुरार पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

धक्कादायक! तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्दे जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनमोल हाईट्स याठिकाणी आज दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मुंबई - मालाड पूर्व येथील त्रिवेणी नगर परिसरात एका तरुणाने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अनमोल हाईट्स याठिकाणी आज दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेयसीसोबत तिच्या घरी वाद झाल्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. त्याला जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी कुरार पोलीस दाखल झाले असून कुरार पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
मुंबई - मालाड पूर्व येथे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) September 30, 2019