धक्कादायक!...म्हणून सहा महिन्याच्या नातीचा आजीने जमिनीवर आपटून घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 02:02 PM2020-03-01T14:02:02+5:302020-03-01T14:05:46+5:30

आरोपी महिलेच्या शोधात पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे.

Shocking! ... so a six month old granddaughters life end by grandmother pda | धक्कादायक!...म्हणून सहा महिन्याच्या नातीचा आजीने जमिनीवर आपटून घेतला जीव

धक्कादायक!...म्हणून सहा महिन्याच्या नातीचा आजीने जमिनीवर आपटून घेतला जीव

Next
ठळक मुद्दे हे प्रकरण पती-पत्नीमधील भांडणाशी संबंधित होते. या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पानिपत - पानिपत येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निर्दयी आजीने तिच्या स्वत: च्या सहा महिन्यांच्या नातीला जमिनीवर आपटून ठार मारले आहे. निष्पाप चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी महिलेच्या शोधात पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे.

हे प्रकरण पती-पत्नीमधील भांडणाशी संबंधित होते. सनोली कसबे शहरातील राणा माजरा गावात ही वृद्ध महिला आपल्या मुलीकडे आली. आपल्या मुलीसाठी नवीन फोन घेण्याच्या मुद्द्यावरून जावयाशी वाद झाला. जेव्हा हा वाद इतका शिगेला पोचला ती विवाहित मुलगी आपल्या आपल्या सहा महिन्याच्या मुलीला घेऊन माहेरी निघाली. पत्नी व मुलीला मामाकडे नेल्याबद्दल पतीने आक्षेप घेतला. या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 



डोके जमिनीवर टेकले आणि वाहू लागले रक्ताचे पाठ

चिडलेल्या सासूने सहा महिन्यांच्या नातीला मारहाण केली. मुलीचे डोके जमिनीवर आपटल्यामुळे फ्रॅक्चर झाले होते. डोक्यातून रक्त वाहून गेलेलं पाहून आरोपी सासू पळून गेली. पोलिसांनी आरोपी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरु केला आहे.


ही महिला जलसा पाहण्यासाठी मुलीच्या घरी गेली होती 

सहारनपूर यूपीमधील बाबुपुरा गावात राहणारी रुकसाना म्हणाली की, बुधवारी ती आपल्या भाचा बिलालच्या राणामाजरा गावात आली होती. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील हरा गावात राहणारी बिलालची सासू ही मुलगी रजिया आणि नात सुनैयाला घेऊन गुरुवारी राणामाजरा गावात जलसा पाहण्यासाठी मुलगी अस्मिनच्या घरी आली होती. 

Web Title: Shocking! ... so a six month old granddaughters life end by grandmother pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.