धक्कादायक! बापाकडून सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 23:58 IST2022-07-25T23:57:41+5:302022-07-25T23:58:24+5:30
Sexual Abuse : निगड़ी पोलिस ठाण्यात गुन्हा

धक्कादायक! बापाकडून सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : सात वर्षांच्या मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मागील पाच महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.
ही घटना निगडी येथे १८ मार्च २०२२ ते २३ जुलै २०२२ या कालावधीत घडली. या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईने सोमवारी दि. २५, निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिनुसार, आरोपीने पीडीत मुलीशी लैंगिक गैरवर्तन केले तसेच लैंगिक हमला करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे गुन्हा दाखल केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.