Shocking! Seeing the child hanged, the mother cut off her hand vein pda | धक्कादायक! मुलाला गळफास घेत लटकलेले पाहून आईने घेतली हाताची नस कापून 

धक्कादायक! मुलाला गळफास घेत लटकलेले पाहून आईने घेतली हाताची नस कापून 

ठळक मुद्देबर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला बर्रा 2 येथील रहिवासी अभिषेक जयस्वाल हा प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करतो.आई खोलीत पोहोचताच मुलाचा मृतदेह लटकलेला पाहून ती किंचाळली.

कानपूर -  बर्रा जिल्ह्यातील बुधवारी सायंकाळी इंटरच्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मोबाइल वापरण्या व बोलण्यावरून विद्यार्थ्याच्या वडिलांनी ओरडल्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मुलाचा मृतदेह लटकलेला पाहून आईने आपल्या हाताची नस कापली, त्यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला बर्रा 2 येथील रहिवासी अभिषेक जयस्वाल हा प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करतो. त्यांच्या पश्चात पत्नी दीपा, मुलगा विभू (18) आणि मुलगी कोसिन असा परिवार आहे. विभूने यंदा इंटरची परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर तो दिवसभर मोबाईल फोनवर बोलत असे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी बर्‍याच वेळा मोबाईलवर बोलल्याबद्दल त्याला तंबी दिली होती. 


बुधवारी सायंकाळी अभिषेक जयस्वाल यांनी विभूला मोबाईल वापरण्या आणि बोलण्यावरून हटकले होते. यामुळे संतापलेला विभू त्याच्या खोलीत गेला. विभू जास्त वेळ खोलीतून बाहेर आला नव्हता, तेव्हा त्याच्या आईने त्याला पाहण्यासाठी धाव घेतली. आई खोलीत पोहोचताच मुलाचा मृतदेह लटकलेला पाहून ती किंचाळली. यानंतर स्वत:चा जीव देण्यासाठी तिने हाताची नस कापली, त्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बर्रा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी  माहितीनुसार, एका मुलाने स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. कौटुंबिक वादाचा विषय समोर येत आहे.

 

Web Title: Shocking! Seeing the child hanged, the mother cut off her hand vein pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.