धक्कादायक! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 21:32 IST2018-11-12T21:29:52+5:302018-11-12T21:32:35+5:30
मृत महिलेचे नाव नीता अनिलकुमार अग्रवाल (वय ५८) असं आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धक्कादायक! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या
मुंबई - कुलाब्यातील बधवार पार्क येथील रेल्वे अधिकारी वसाहतीत राहणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत महिलेचे नाव नीता अनिलकुमार अग्रवाल (वय ५८) असं आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास बधवार पार्क एल ब्लॉक येथे राहणाऱ्या अनिलकुमार अग्रवाल यांच्या पत्नीने नीता यांनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आणि नीता यांना मुंबई सेंट्रल येथील जग जीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी ११. ५५ वाजता त्यांना मृत घोषित केले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. अद्याप आत्महत्येचे कारण कळलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.