धक्कादायक...! टाटा इन्स्टिट्युटमधील मुलींच्या हॉस्टेलसमोर पोलिसाचे हस्तमैथुन; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 13:53 IST2020-02-02T13:52:03+5:302020-02-02T13:53:03+5:30

टाटा इन्स्टिट्यूटच्या या हॉस्टेलमध्ये 120 मुली राहतात.

Shocking ...! Police masturbates in front of girls hostel at Tata Institute; Video goes viral | धक्कादायक...! टाटा इन्स्टिट्युटमधील मुलींच्या हॉस्टेलसमोर पोलिसाचे हस्तमैथुन; व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक...! टाटा इन्स्टिट्युटमधील मुलींच्या हॉस्टेलसमोर पोलिसाचे हस्तमैथुन; व्हिडीओ व्हायरल

हैदराबाद : टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस (TISS)च्या विद्यार्थिनींच्या हॉस्टेलसमोर एका पोलीस चक्क हस्तमैथुन करताना सापडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 


हा धक्कादायक प्रकार चार महिन्यांपूर्वीचा असल्याचे समोर येत आहे. मात्र, या पोलिसावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. हा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला. रचकोंडा पोलिसांनी विद्यार्थीनींशी संपर्क साधला आणि तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या व्हिडीओमध्ये पोलिस अधिकारी टीस मुलींच्या हॉस्टेलसमोर दिवसा रस्त्याकडेला उभा राहून हस्तमैथुन करताना दिसत आहे. शिवाय बाजुला त्याने मोटारसायकलही उभी केलेली आहे. ही घटना 20 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता घडलेली आहे. 


पोलिसाचे हे कृत्य विद्यार्थिनींनी कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले. हे पाहूनही त्या पोलिसाने कृत्य सुरूच ठेवले. अखेर या विद्यार्थिनींनी मदतीसाठी ओरडा मारताच त्याने काढता पाय घेतल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याच्या दुचाकीलाही नंबर प्लेट नव्हती, असे या विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


टाटा इन्स्टिट्यूटच्या या हॉस्टेलमध्ये 120 मुली राहतात. राचकोंडा पोलिस ठाण्यात आम्ही तक्रार करण्यासाठी गेलो तरीही त्यांनी तक्रार ऐकून घेतली नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदिबाटला पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्य़ांनी दखल घेतली आणि तक्रार दाखल केली, असा आरोप विद्यार्थिनीच्या मित्राने केला आहे. 


या तक्रारीमध्ये हा काही पहिलाच प्रकार नसल्याचे म्हटले आहे. हॉस्टेल परिसरात अनेकदा लोक येऊन हे प्रकार करतात. कॉलेज कॅम्पस आणि हॉस्टेलमधील अंतर 500 मीटरचे आहे. हा परिसर निर्जन, झाडीझुडपांचा असल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले. 

Web Title: Shocking ...! Police masturbates in front of girls hostel at Tata Institute; Video goes viral