शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महिलांच्या वॉशरुममध्ये कॅमेरा लावणाऱ्या पोलिसाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 14:37 IST

या अटक पोलिसाला न्यायालयाने जामीन मंजूर केला

ठळक मुद्दे अटक केल्यानंतर अनिकेतचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले. अनिकेत परब असं आरोपीचे नाव असून त्यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.

मुंबई - बँकेच्या प्रसाधनगृहात महिला सहकाऱ्याचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुरुवारी एका २९ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली होती. अनिकेत परब असं आरोपीचे नाव असून त्यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. आरोपी हा वरळी पोलीस लाईनमध्ये राहतो. अटक केल्यानंतर अनिकेतचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले. या अटक पोलिसाला न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

गेल्या आठवड्यात अनिकेत परबला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मंजूर झाला. आरोपीला वांद्रयातील हिल रोडवरील सरकारी बँकेमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. तक्रारदार महिला तीन दिवसांपूर्वीच तिथे आली होती. बुधवारी पावणेपाच वाजताच्या सुमारास कामावर आल्यानंतर तक्रारदार महिला पोलीस कपडे बदलण्यासाठी रेस्ट रुममध्ये गेली. अनिकेत परब तिथे आधीपासूनच होता. तिने त्याला तिथून बाहेर जाण्यास सांगितले.आरोपी बाहेर गेल्यानंतर कपडे बदलत असताना तिथे लपवून ठेवलेल्या मोबाइल फोनवर लक्ष गेले. मोबाईलचा कॅमेरा महिलेच्या दिशेने होता. मोबाईल नजरेस पडू नये यासाठी त्यावर रुमाल घातलेला होता. फोन हातात घेतला तेव्हा व्हिडीओ मोड ऑन होता. तक्रारदार महिला खाली गेली व तिने परबला या कृत्याचा जाब विचारला. तेव्हा त्याने मोबाईल तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि माझ्या फोनला हात लावण्याची तू हिम्मत कशी केलीस ? असा जाब तिला विचारला.परब नंतर वॉशरुममध्ये पळाला. तिथून बाहेर आल्यानंतर त्याने तिला आपला मोबाईल दाखवला आणि त्यात काहीही रेकॉर्ड केले नाही असा दावा त्याने केला. आरोपीने वॉशरूममध्ये जाऊन व्हिडीओ डिलीट केल्याचा मला संशय आहे. मी माझ्या वरिष्ठांना याबद्दल सांगितले. पोलीस उपायुक्त बँकेत आले. त्यांनी संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला तात्काळ एफआयआर नोंदवण्यास सांगितले अशी माहिती तक्रारदार महिलेने दिली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीsuspensionनिलंबन