धक्कादायक ! 4 वर्षाच्या चिमुरड्याने मृत आई-वडीलांसोबत काढली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:05 PM2019-03-29T13:05:15+5:302019-03-29T13:17:34+5:30

सायनमधील घटना : क्षयरोगाला कंटाळून केली आत्महत्या

Shocking The night after the 4-year-old kid was with the dead body of mother and father | धक्कादायक ! 4 वर्षाच्या चिमुरड्याने मृत आई-वडीलांसोबत काढली रात्र

धक्कादायक ! 4 वर्षाच्या चिमुरड्याने मृत आई-वडीलांसोबत काढली रात्र

Next
ठळक मुद्दे4 वर्षाचा चिमुरडा रात्रभर मृत आईच्या कुशीत होता.याप्रकरणी सायन पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.सायन पूर्वेकड़ील पालिका वसाहतीत विवेक कांबळे (३०) आणि सारीका कांबळे (२६) हे चार वर्षाच्या मुलासोबत रहायचे.

मुंबई - क्षयरोगाच्या आजारपणाला कंटाळून एका जोडप्याने आयुष्य संपविल्याची घटना सायनमध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा 4 वर्षाचा चिमुरडा रात्रभर मृत आईच्या कुशीत होता. याप्रकरणी सायन पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
सायन पूर्वेकड़ील पालिका वसाहतीत विवेक कांबळे (३०) आणि सारीका कांबळे (२६) हे 4 वर्षाच्या मुलासोबत रहायचे. मंगळवारी रात्रीपासून दोघेही कॉल घेत नसल्याने विवेकचा भाऊ राजेशने बुधवारी सकाळी ६ वाजताच घर गाठले. भाऊ आणि वहीनी आजारपणामुळे नैराश्येत असल्याचे माहिती होते. त्यात दरवाजा वाजवून देखील काहिही प्रतिसाद न आल्याने त्याला संशय आला. त्याने दरवाजा तोडला. तेव्हा विवेक गळफास घेतलेल्या अवस्थेत तर सारीका ही जामिनीवर बेशुद्धावस्थेत आढ़ळून आली. तिच्या जवळ विषाची बाटली देखील आढ़ळून आली. तर ४ वषार्चा चिमुकला रडतच तिच्या कुशीत झोपून होता. तिघांनाही तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यपूर्वीच विवेक आणि सारीकाला मृत घोषित करण्यात आले. नातेवाईकांच्या चौकशीतून क्षयरोगाला कंटाळून त्यांनी हे पाउल उचलल्याचे समोर आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांनी दिली.



 

Web Title: Shocking The night after the 4-year-old kid was with the dead body of mother and father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.