Crime News: धक्कादायक! मावळ तालुक्यातील बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:39 IST2022-08-03T21:18:00+5:302022-08-04T14:39:51+5:30
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती

Crime News: धक्कादायक! मावळ तालुक्यातील बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपी ताब्यात
Crime News: मावळ तालुक्यातील गावातून एका सात वर्षीय मुलीचे मंगळवारी अपहरण झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. येथील सात वर्षीय मुलगी मंगळवारी (२ ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. अखेर बुधवारी (३ ऑगस्ट) तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
गावातील मंदिरासमोर खेळत असलेली ही मुलगी मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. गावातील नागरिकांसह तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. अखेर आज गावातील शाळेच्या पाठीमागे तिचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला. तिच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली आहे. या प्रकरणात तेजस उर्फ दाद्या महिपती दळवी असे संशयिताचे नाव असून संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.