धक्कादायक! ठाणे कारागृहात कैद्याकडे सापडले पैसे, नशेच्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 17:28 IST2018-12-22T17:27:05+5:302018-12-22T17:28:35+5:30

पुनित उर्फ अजय कृष्णचंद तिवारी असं या कैद्याचे नाव असून त्याचावर मोक्काअन्वये कारवाई झाली आहे. तिवारीची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली होती. 

Shocking Money found in prison in Thane jail, drug pills | धक्कादायक! ठाणे कारागृहात कैद्याकडे सापडले पैसे, नशेच्या गोळ्या

धक्कादायक! ठाणे कारागृहात कैद्याकडे सापडले पैसे, नशेच्या गोळ्या

ठळक मुद्देएका कैद्याकडे पैसे आणि नशेच्या गोळ्या सापडल्याची धक्कादायक माहिती उघड पुनित उर्फ अजय कृष्णचंद तिवारी असं या कैद्याचे नाव असून त्याचावर मोक्काअन्वये कारवाई झाली कारागृह प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह निर्माण झालं आहे.

ठाणे - ठाणे मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याकडे पैसे आणि नशेच्या गोळ्या सापडल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पुनित उर्फ अजय कृष्णचंद तिवारी असं या कैद्याचे नाव असून त्याचावर मोक्काअन्वये कारवाई झाली आहे. तिवारीची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली होती. 

कासारवडवली पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यातील पुनीत 31 जुलै 2012 पासून ठाणे कारागृहात कैदी आहे. बॅरेक नंबर 2 मध्ये असलेल्या कैद्यांमध्ये पुनीतकडे नशेच्या गोळ्या असल्याची चर्चा सुरू होती. ही चर्चा एका कारागृह कर्मचाऱ्यापर्यंत पोचली. त्यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे पांढऱ्या रंगाच्या सहा गोळ्या एक पिशवीत सापडल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या पिशवीत गुंडाळी केलेल्या पाचशे रुपयांच्या पाच नोटा देखील सापडल्या आहेत. याप्रकरणी पुनीतच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ठाणे कारागृहात यापूर्वीही इतर कैद्यांकडे वेगवेगळ्या वस्तू सापडलेल्या होत्या. त्यामुळे कारागृह प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह निर्माण झालं आहे.

Web Title: Shocking Money found in prison in Thane jail, drug pills