धक्कादायक! बेपत्ता मुलीचा शौचालयात आढळला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 21:53 IST2019-08-04T21:51:11+5:302019-08-04T21:53:02+5:30

याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

Shocking! Missing girl's body found in toilet | धक्कादायक! बेपत्ता मुलीचा शौचालयात आढळला मृतदेह 

धक्कादायक! बेपत्ता मुलीचा शौचालयात आढळला मृतदेह 

ठळक मुद्देएल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती. शनिवारी सकाळी ११ वाजता पायधुनी येथील सार्वजनिक शौचालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या आहे हत्या यापबाबत पोलीस तपास करत आहेत.

मुंबई - एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी शुक्रवारपासून बेपत्ता होती. याबाबत एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती. मात्र, शनिवारी सकाळी ११ वाजता पायधुनी येथील सार्वजनिक शौचालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केल्याचा संशय नातेवाईकांकडून वर्तविण्यात येत आहे. यातूनच त्यांनी रविवारी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. ही आत्महत्या आहे हत्या यापबाबत पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: Shocking! Missing girl's body found in toilet