धक्कादायक! महिलांच्या 'फर्स्ट क्लास'च्या डब्यात अल्पवयीन मुलाचं हस्तमैथुन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 21:31 IST2019-07-29T21:29:38+5:302019-07-29T21:31:40+5:30
मुलाचा व्हिडिओ शूट करून ट्विटरवर पोस्ट करत मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.

धक्कादायक! महिलांच्या 'फर्स्ट क्लास'च्या डब्यात अल्पवयीन मुलाचं हस्तमैथुन
ठाणे - लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात एक अल्पवयीन मुलगा हस्तमैथुन करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीने त्या मुलाचा व्हिडिओ शूट करून ट्विटरवर पोस्ट करत मुंबई पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी ठाणे स्टेशनजवळ हा प्रकार घडला. त्या तरुणीने ठाण्याहून सीएसटीएमला जाणारी सायंकाळची ६.३२ वाजताची लोकल पकडली होती. स्थानक सोडून दोन मिनिट होताचक्षणी एक मुलगा डब्याच्या गेटजवळ बसलेला तिला दिसला. नंतर तो हस्तमैथुन करत असल्याचं त्यांना आढळलं. हा अश्लील, लाजिरवाणा आणि घाणेरडा प्रकार पाहून डब्यात असलेल्या सर्वच महिला प्रवासी घाबरून गेल्या. त्या तरुणीने त्याचा व्हिडिओ ट्विटरवर टाकत मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे. त्यावर मुंबई पोलिसांना ट्विटला रिप्लाय देत रेल्वे पोलिसांना याबाबत कळविले असल्याचे सांगितले. याबाबत ठाणे रेल्वे पोलिसांना विचारले असता संबंधित तरुणी तक्रार दाखल करण्यासाठी आलेली नसून याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
ठाणे - धक्कादायक! महिलांच्या 'फर्स्ट क्लास'च्या डब्यात अल्पवयीन मुलाचं हस्तमैथुन https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2019