मुंबईतील धक्कादायक घटना! तरुणीला ओढत प्लॅटफाॅर्मवर नेले; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 06:00 IST2026-02-13T05:59:16+5:302026-02-13T06:00:02+5:30
तरुणीने आरडाओरडा करताच नागरिक जमताहेत पाहून तो पळून गेला. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली

मुंबईतील धक्कादायक घटना! तरुणीला ओढत प्लॅटफाॅर्मवर नेले; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतले अन्...
मुंबई - प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्याच्या रागात तरुणाने तिचा पाठलाग करून तिला मुलुंड रेल्वेस्थानकात नेत आत्मदहनाची धमकी दिली. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मुलुंडमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी घाटीपाडा परिसरात राहत असताना तिची पुरब मनोहर गोरे (२१) याच्याशी ओळख झाली होती. २०२४ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वारंवार होणाऱ्या वादांमुळे डिसेंबर २०२५ पासून तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडला होता. त्यामुळे तिच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर नेहमी पाठलाग करायचा.
बुधवारी ती कामासाठी घराबाहेर पडताच गोरे तिच्या शॉपबाहेर आला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच तिचा हात पकडून २० ते २५ फूट अंतरावर असलेल्या मुलुंड रेल्वेस्थानकात नेले. तिचा मोबाइल तपासला. त्यानंतर त्याच्या खिशातून पेट्रोलने भरलेली बॉटल काढून स्वतःच्या अंगावर ओतून घेत, सोबत नाही राहिली तर स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिली. तरुणीने आरडाओरडा करताच नागरिक जमताहेत पाहून तो पळून गेला. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.