धक्कादायक घटना! सीपीआरमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 15:24 IST2021-02-08T15:17:10+5:302021-02-08T15:24:01+5:30
Molestation : रविवारी घडली ही धक्कादायक घटना

धक्कादायक घटना! सीपीआरमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न
कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाच्या नर्सिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सीपीआरच्या पुरुष परिचारिकाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी १० च्या सुमारात ओटी विभागात घडली. या घटनेने सीपीआरमध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती पीडित विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांनी दिली. ते सकाळी सोलापूरहून तातडीने कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे आणि परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिली.ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी संशयिताला चोप दिला. दरम्यान, या घटनेनंतर पीडित विद्यार्थ्यांनीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला सीपीआर दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर तिथे उपचार सुरु आहे. या प्रकरणी सीपीआर पोलिस चौकीत गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सीपीआरमध्ये घडलेली ही घटना गंभीर स्वरुपाची आहे. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी म्हटले आहे.