धक्कादायक! विवाहितेच्या 'प्रायव्हसी'वर सासरच्यांची नजर, बेडरूमपासून किचनपर्यंत लावले कॅमेरे अन्...; संतापजनक प्रकार उघड, पोलीसही थक्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:33 IST2026-02-20T14:32:26+5:302026-02-20T14:33:08+5:30

या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत धाव घेतली आहे....

Shocking In-laws eyes on the privacy of a married woman, cameras installed from the bedroom to the kitchen Shocking details revealed, even the police are shocked in agra | धक्कादायक! विवाहितेच्या 'प्रायव्हसी'वर सासरच्यांची नजर, बेडरूमपासून किचनपर्यंत लावले कॅमेरे अन्...; संतापजनक प्रकार उघड, पोलीसही थक्क 

धक्कादायक! विवाहितेच्या 'प्रायव्हसी'वर सासरच्यांची नजर, बेडरूमपासून किचनपर्यंत लावले कॅमेरे अन्...; संतापजनक प्रकार उघड, पोलीसही थक्क 

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवण्यासाठी थेट बेडरूमपासून किचनपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा प्रकार घडला आहे. महत्वाचे म्हणजे, हा संपूर्ण छळ हुंड्यावरून सुरू होता. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत धाव घेतली आहे. 

संतापजनक प्रकार उघड -
संबंधित पीडिता आग्रा येथील ट्रान्स यमुना भागातील रहिवासी आहे. १२ मार्च २०१९ रोजी तिचे लग्न कपिल देव याच्याशी झाले होते. पीडितेच्या आरोपानुसार, लग्नात माहेरच्यांनी सुमारे १५ लाख रुपये खर्च करून सोन्या-चांदीचे दागिने, फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य, पाच लाख ५० हजारांची रोकड, बुलेट मोटारसायकल आदी सासरच्यांना दिले होते. मात्र, सासरच्या लोकांचे यावर समाधान झाले नाही. त्यांना आणखी हुंडा हवा होता. महत्वाचे म्हणजे, पीडितेचा दोन मुले झाल्यानंतरही छळ सुरूच होता. आता आरोपींकडून 'वॅगन-आर' कार आणि २ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती.

बेडरूमपासून ते किचनपर्यंत CCTV कॅमेरे आणि मानसिक छळ -
पीडितेने म्हटले आहे की, तिच्या दिराने घरातील बेडरूम आणि स्वयंपाकघरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. संबंधित विवारीतेच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ लागले आणि टोमणे मारले जाऊ लागले. मानसिक त्रास देण्यासाठी हा संपूर्ण प्रकार होता. जेव्हा तिने या कॅमेऱ्यांचा विरोध केला, तेव्हा तिला मारहाण करून घरातून बाहेर काढण्यात आले.

५ नोव्हेंबर २०२५ रोजी पीडितेला गंभीर मारहाण करण्यात आली आणि दुसऱ्या घरात लग्नची धमकी देण्यात आली. इतकेच नाही तर १२ डिसेंबर २०२५ रोजी मुलाची प्रकृती खराब असतानाही तिला घरातून हाकलून देण्यात आले. सध्या सर्व घरगुती साहित्य सासरच्यांनी स्वतःकडेच ठेवून घेतले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
 

Web Title : चौंकाने वाला! ससुराल वालों ने कैमरे से महिला की जासूसी की; पुलिस हैरान।

Web Summary : आगरा में दहेज के लिए एक महिला को प्रताड़ित किया गया। उसके ससुराल वालों ने उसकी हर हरकत पर नज़र रखने के लिए बेडरूम और किचन में सीसीटीवी कैमरे लगाए, जिससे गंभीर मानसिक और शारीरिक शोषण हुआ। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Outrage! In-laws Spied on Woman with Cameras; Police Shocked.

Web Summary : In Agra, a woman was harassed for dowry. Her in-laws installed CCTV cameras in the bedroom and kitchen to monitor her every move, leading to severe mental and physical abuse. Police are investigating the case.