नालासोपारा - ठाणे मध्यवर्ती कारागृहातून वसई न्यायालयात आणलेल्या 16 कैद्यांपैकी 5 कैद्यांनी पोलीस व्हॅनमध्ये बुधवारी जोरदार हंगामा करून तोडफोड केली. पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी वसई पोलीस ठाण्यात पाचही आरोपी कैद्यांविरुद्ध वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मध्यवर्ती कारागृहातुन वसई न्यायालयात हजर करण्यासाठी 10 पोलीस पोलीस व्हॅनमध्ये (क्रमांक एम एच 04 सी 0223) 16 कैद्यांना बुधवारी आणण्यात आले होते. न्यायालयाच्या बाहेरील कैद्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास आणि घरच्यांनी डब्यातून आणलेले जेवण सुद्धा देण्यास पोलिसांनी मनाई केली होती. याच कारणाने नाराज असलेल्या 16 कैद्यापैकी पाच कैद्यांनी ठाण्याला जात असताना पोलीस व्हॅनमध्ये जोरदार हंगामा करून ड्रायव्हरच्या मागील असलेल्या कॅबिनच्या पत्र्यास जोराजोराने लाथा मारून पत्रा वाकवून टाकला. समजवण्यास गेलेल्या पोलिसांना शिविगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. कैदी बालाजी शिवाजी नितावझे याने हातामधील बेडी काढून गाडीबाहेर फेकून दिले. पोलिसांनी चिराग रवींद्र मेढेकर, सुनील संदीप वाघमारे, बालाजी शिवाजी नितावझे, मोहम्मद अजगर अत्तार खान आणि चंद्रकांत वसंत भगली उर्फ चंदया या पाच कैद्यांविरुद्ध वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक! कैद्यांचा हंगामा; पोलिसांना शिवीगाळ करत केली धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 19:17 IST
पोलिसांनी वसई पोलीस ठाण्यात पाचही आरोपी कैद्यांविरुद्ध वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक! कैद्यांचा हंगामा; पोलिसांना शिवीगाळ करत केली धक्काबुक्की
ठळक मुद्दे5 कैद्यांनी पोलीस व्हॅनमध्ये बुधवारी जोरदार हंगामा करून तोडफोड केली.पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.