धक्कादायक! पैशाच्या वादातून इडली विक्रेत्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 21:29 IST2021-02-05T21:28:17+5:302021-02-05T21:29:00+5:30
Murder Case : तीन आरोपींविरोधात नया नगर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

धक्कादायक! पैशाच्या वादातून इडली विक्रेत्याची हत्या
ठळक मुद्देइडली विक्रेत्या वीरेंद्र यादव (४५) ची हत्या करण्यात आली असल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.
मीरारोड - मीरारोडच्या रसाज मॉलजवळ पैशाच्या वादातून इडली विक्रेत्या वीरेंद्र यादव (४५) ची हत्या करण्यात आली असल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.
शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास तीन मजूर इडली खाण्यास आले. सदर इडली विक्रेत्यांशी पैशांवरून भांडण सुरु झाले. त्यावेळी एका मुजराने विक्रेत्याला जोरात धक्का दिला. त्यामुळे इडली विक्रेता खाली कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. तीन आरोपींविरोधात नया नगर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.