शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; सहाजण ताब्यात    

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 20:08 IST

ती बेशुद्ध पडेपर्यंत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.  बिहार महिला आयोगाच्या प्रमुख मिश्रा यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली १४ ऑगस्ट रोजी काहीजणांनी मिळून पीडित मुलीचं अपहरण केलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली.

पाटणा - बिहारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर गया जिल्हा पंचायतने तिचं मुंडन करत गावात धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींच्या नातेवाईकांच्या प्रभावाखाली पंचायतने मुलीला ही शिक्षा सुनावली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही धक्कादायक घटना घडण्याआधी १४ ऑगस्ट रोजी काहीजणांनी मिळून पीडित मुलीचं अपहरण केलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांनतर पीडित अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने स्थानिक पंचायतीच्या इमारतीवर घेऊन गेले आणि ती बेशुद्ध पडेपर्यंत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.  

घटनेच्या दुसऱ्या दिवशी एका गावकऱ्याने तरुणीला पाहिल्यानंतर तिच्या कुटंबियांना कळवलं. यानंतर तिला घरी नेण्यात आलं. गावात आरोपींच्या नातेवाईकांचा वचक असल्याने पंचायतीने आरोपींना शिक्षा सुनावण्याऐवजी पीडित मुलीलाच दोष देत तिचे मुंडन करून धिंड काढली. घटनेच्या ११ दिवसानंतर सोमवारी म्हणजेच काल याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित अल्पवयीन तरुणी आणि तिच्या आईने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरच हा गुन्हा दाखल करण्यात आला. पंचायतीच्या पाचही सदस्यांना देखील पोलिसांनी आरोपी केलं असून पॉस्कोअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींपैकी एकाची ओळख पीडितीने पटली असून त्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर आरोपींची ओळख पीडित तरुणी अद्याप पटवू शकलेली नाही”, अशी माहिती मोहनपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रवीभूषण यांनी दिली आहे. बिहार महिला आयोगाच्या प्रमुख मिश्रा यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याप्रकरणी सविस्तर अहवाल तयार करत २ सप्टेंबरच्या आधी सर्व पंचायत सदस्यांना आयोगासमोर हजर करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसBiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदा