शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! स्मशानभूमीच्या वादातून ग्रामपंचायतीसमोर केला अंत्यविधी; ७३ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 14:30 IST

ही घटना शनिवारी भोकरदन तालुक्यातील राजूर (जि. जालना) येथे घडली होती.

ठळक मुद्देगत दहा वर्षापासून लिंगायत समाजाला स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी ८० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झाल्याने अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला.

राजूर (जि. जालना) :  ग्रामपंचायतीच्या प्रांगणात वीरशैव लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार वृद्ध महिलेच्या पार्थिवावर अंत्यविधी केल्याप्रकरणी शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह ७३ जणांवर राजूर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी भोकरदन तालुक्यातील राजूर (जि. जालना) येथे घडली होती.

राजूर येथील शिवा संघटनेच्या शाखेची गत दहा वर्षापासून लिंगायत समाजाला स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी आहे, परंतु या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यातच शनिवारी समाजातील एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झाल्याने अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला. शिवा संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आणून वीरशैव लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार अंत्यविधी केला. त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समाजबांधवांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदे यांनी राजूर पोलिसात तक्रार दिली.

त्यांनी फिर्यादीत म्हटले, ‘नियोजित कट करून बेकायदेशीररीत्या मंडळी जमवून व ग्रामपंचायतच्या आवारात सरकारी कामात अडथळा आणला व जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ शकतो याची माहिती असतानाही ग्रामपंचायत आवारात अंत्यविधी केला. तसेच प्रा. धोंडे यांनी दूरध्नवनीवरुन समाजाला गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.’ या फिर्यादीवरून प्रा. मनोहर धोंडे, सतीश तवले, कैलास गबाळे, भीमाशंकर दारूवाले, मनमथ दारूवाले, रामेश्वर जीतकर, रमेश जीतकर, गणेश हिंगमीरे, भाऊसाहेब कोमटे, गजानन आगलावे, स्वप्नील दारूवाले, भरत कोमटे, कैलास पुंगळे, सुनील कोमटे, राम कोमटे, गणेश फुटाणकर, शैलेश देशमाने, रमाकांत हिंगमीरे यांच्यासह ७३ महिला-पुरूषांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संतोष घोडके हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना