धक्कादायक! नेपाळमध्ये भारतीय कुटुंबातील चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:59 IST2020-01-30T21:57:36+5:302020-01-30T21:59:32+5:30
त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूपानडेही जिल्ह्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

धक्कादायक! नेपाळमध्ये भारतीय कुटुंबातील चौघांचा मृत्यू
काठमांडू - भारतातील एकाच कुटुंबातील दोन मुलांसह चार भारतीय नागरिकांचा नेपाळमध्ये पोत्यांच्या ढिगाखाली चिरडल्यामुळे मृत्यू झाला. पश्चिम नेपाळमधील नंबर 5 प्रांतातील सिद्धार्थनगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहजाद हुसेन (वय ३०), त्यांची पत्नी सब्बाद खातून आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा यांचा भाड्याच्या खोलीत पोत्याच्या ढिगाऱ्याखाली चिरडून मृत्यू झालेल्या स्थितीत आढळून आले. ते मूळ बिहारचे होते. प्राथमिक वृत्तानुसार, या चौघांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असावा असा नेपाळ पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूपानडेही जिल्ह्यातील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये केरळमधील चार अल्पवयीन मुलांसह आठ भारतीय पर्यटकांचा मकवानपूर जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये खोलीत असलेल्या हीटरमधून संशयित गॅस गळतीमुळे ते बेशुद्ध पडून मृत्यू झाला होता.