धक्कादायक! संजय राऊत यांच्या घरात सापडले साडे अकरा लाख, ईडीने केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 20:53 IST2022-07-31T20:52:20+5:302022-07-31T20:53:25+5:30
Sanjay Raut : गेल्या २ तासांपासून ईडी संजय राऊत यांचा जबाब नोंदवत आहे.

धक्कादायक! संजय राऊत यांच्या घरात सापडले साडे अकरा लाख, ईडीने केले जप्त
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १०अधिकारी पोहोचले आहेत. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु झाली. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा हळूहळू वाढू लागला. दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले होते. त्यानंतर साडेनऊ तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानातून ईडीने साडे अकरा लाख जप्त केले आहेत. गेल्या २ तासांपासून ईडी संजय राऊत यांचा जबाब नोंदवत आहे.
तसेच दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. तेथे संजय राऊत यांच्या मुलीला ईडीचे अधिकारी सोबत घेऊन गेले असल्याची माहित सूत्रांनी दिली. तसेच गोरेगाव येथे देखील ईडीने छापेमारी केली. आधी ईडीने अलिबाग येथील संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या नवे असलेली जमीन जप्त केली असून दादर येथील फ्लॅट देखील ईडीने ताब्यात घेतला आहे. त्यानंतर आज सर्च ऑपरेशनदरम्यान ईडीला संजय राऊत यांच्या घरी साडे अकरा लाख रूपये सापडले आहेत.
संजय राऊतांनी गळ्यातील गमछा काढून गरगर फिरवला अन् झाले ईडी कार्यालयाकडे रवाना