धक्कादायक! खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 15:05 IST2020-04-17T15:01:22+5:302020-04-17T15:05:46+5:30
खैरलांजी हत्याकांडात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

धक्कादायक! खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू
ठळक मुद्देआरोपी सकरू बिंजेवार (61) याचा अखेर उपचारादरम्यान मेडिकलमध्ये गुरुवारी मृत्यू झाला. उपचारादरम्यान गुरुवारी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपूर : बहुचर्चित खैरलांजी हत्याकांडातील आरोपी सकरू बिंजेवार (61) याचा अखेर उपचारादरम्यान मेडिकलमध्ये गुरुवारी मृत्यू झाला.
खैरलांजी हत्याकांडात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. 7 एप्रिल ला त्याची प्रकृती खालावल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणाची कारागृह प्रशासनाकडून धंतोली पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.