धक्कादायक..! पिरंगुटमध्ये पतीकडून गरोदर पत्नीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 16:18 IST2019-02-20T16:18:04+5:302019-02-20T16:18:54+5:30

पिरंगुट येथे कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या गरोदर  असलेल्या पत्नीची श्रत्राने वार करुन तिची निर्घृण हत्या केली .

Shocking ..! the cruelty murdred of pregnant wife by husband in Pirangut | धक्कादायक..! पिरंगुटमध्ये पतीकडून गरोदर पत्नीची निर्घृण हत्या

धक्कादायक..! पिरंगुटमध्ये पतीकडून गरोदर पत्नीची निर्घृण हत्या

ठळक मुद्दे तसेच त्यानंतर स्वत:ला भोसकून घेत पतीची जीवनयात्रा संपविली

 पुणे : पिरंगुट येथे कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या गरोदर  असलेल्या पत्नीची श्रत्राने वार करुन तिची निर्घृण हत्या केली . तसेच त्यानंतर स्वत:ला भोसकून घेत जीवनयात्रा संपविली. सुनील विलास शिंदे (वय -२८) असे आरोपी पतीचे नाव आहे.ही हृदयद्रावक घटना (दि. 20 फेब्रूवारी) रोजी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली. सुनील शिंदे याचे मूळगाव मुळशी तालुक्यातील पिंपळोली हे असून त्याचा पिरंगुट येथे वाहनांच्या बॅटरी विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे.व्यवसायाच्या निमित्ताने तो पिरंगुट येथील मुळशी टॉवर या इमारतीत राहत होता. मागील एक वर्षांपूर्वीच त्याचे अनिता बरोबर लग्न झाले होते. लग्नापूर्वी त्याने मुळशी टॉवर या इमारतीत स्वत:चा फ्लॅट विकत घेतला होता.दोघे नवरा बायको या नवीन घरात वास्तव्यास होते. सुनीलचा बॅटरी विक्री व दुरुस्ति चा व्यवसाय आणि आध्यात्मिकक्षेत्रात लोकसंपर्क मोठा होता. अत्यन्त शांत व मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याने असे कृत्य केलेच कसे? याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
सकाळी घरात असताना नवरा बायको मध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले. आतून दार लावून हे भांडण सुरु असताना पत्नीला तो मारहाण  केल्यानंतर ती गॅलरीत येऊन मला वाचवा मला वाचवा अशा हाका मारू लागली. त्यावेळी त्या इमारतीत राहणारे लोक शिंदे यांच्या घराच्या दिशेने पळाले . परंतु, दरवाजा आतून बंद असल्याने कोणालाच काही करता येईना.शेजारील नागरिक दारात उभे राहून आवाज देत असताना आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने सदर माहिती पोलिसांना कळविल्यावर घटना स्थळी पोलीस पोहचले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढलले. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्या अगोदरच दोघांचीही प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. पुढील तपासणीसाठी मृतदेह ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Shocking ..! the cruelty murdred of pregnant wife by husband in Pirangut