धक्कादायक! कारचा आरसा तुटला, म्हणून जीवच घेतला...! VIDEO मधून समोर आलं बेंगलोर रोड रेज प्रकरणातलं सत्य; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 13:14 IST2025-10-30T13:13:43+5:302025-10-30T13:14:39+5:30
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना ही एक नियोजित हत्या असल्याची शंका आली. या प्रकरणी एका दांपत्याला अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! कारचा आरसा तुटला, म्हणून जीवच घेतला...! VIDEO मधून समोर आलं बेंगलोर रोड रेज प्रकरणातलं सत्य; नेमकं काय घडलं?
कर्नाटकची राजधानी असलेले बेंगलोर 'रोड रेज'च्या घटनाने पुन्हा एकदा हादरले आहे. साउथ पोलिसांनी हे प्रकरण उघड केले. यात, केवळ गाडीचा साइड मिरर तुटल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. सुरुवातीला ही घटना साधारण अपघात वाटत होती. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना ही एक नियोजित हत्या असल्याची शंका आली. या प्रकरणी एका दांपत्याला अटक करण्यात आली आहे.
ही घटना २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री येथील श्रीराम मंदिर परिसरात घडली. दर्शन नावाचा २४ वर्षीय गिग वर्कर आणि त्याचा मित्र वरुण स्कूटीवरून जात होते. तेव्हाच एका वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दर्शनचा जागीच मृत्यू झाला, तर वरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारने दुचाकीचा पाठलाग करून साइडने धडक दिली आणि फरार झाल्याचे स्पष्ट दिसते.
पोलीस तपासातून समोर आले आहे की, आधी दुचाकी कारला धडकली होती. यामुळे कारचा साइड मिरर फुटला होता. या किरकोळ घटनेवरून कारचालक मनोज शर्मा संतापले. त्यांनी कार वळवून स्कूटीचा पाठलाग केला आणि त्यांना जाणून बुजून धडक दिली. शर्मा हे व्यवसायाने शारीरिक शिक्षण शिक्षक आहेत.
🚨 Bengaluru KA, D*adly Road Rage!
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) October 29, 2025
A Kalaripayattu trainer & his wife allegedly rammed their car into a delivery agent’s bike near JP Nagar, after its handle grazed their mirror.
The biker d!ed on the spot, while the pillion rider survived. pic.twitter.com/Y0lNFtr2Iq
घटनेच्या काही वेळानंतर मनोज आणि त्याची पत्नी आरती मास्क घालून घटनास्थळी परत आले. त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी कारचे तुकडे गोळा करून नेले. पोलिसांनी दोघांविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे.
डीसीपी (साऊथ) लोकेश जगलासूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात नसून ठरवून घडून आणलेली घटना आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.