Shocking! A case has been registered against a couple living next door for cutting off the genitals of a pet dog | क्रूरता! पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापले; शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

क्रूरता! पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापले; शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देरसुलाबाद पोलिसांनी सांगितले की, सुरेश सिंह यांच्याकडून तक्रार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरच्या सुजानपूर परिसरात अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप मालकाने शेजाऱ्यांवर केला आहे. सोमवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

रसुलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजानपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. सुजानपूरमधील कुत्र्याचे मालक सुरेश सिंह यांनी शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आल्यानंतर तिथे सिंह पोहोचलो. जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेला कुत्रा पडला होता. त्याला तात्काळ पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे सुरेश सिंह यांनी सांगितले.

 

रसुलाबाद पोलिसांनी सांगितले की, सुरेश सिंह यांच्याकडून तक्रार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांना लगेच घटनास्थळी आणि पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती घेण्यात आली. रसूलबादचे निरीक्षक शशी भूषण मिश्रा म्हणाले, "घटनेची तपासणी करण्यासाठी उपनिरीक्षकास घटनास्थळी आणि पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. जर हे आरोप खरे ठरले तर दोषींवर भादंवि कलम 429 (mischief by killing or maiming cattle, etc) आणि  कलम 11 of the Prevention of Cruelty to Animals Act." अन्वये कारवाई करण्यात येईल. 

Web Title: Shocking! A case has been registered against a couple living next door for cutting off the genitals of a pet dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.