धक्कादायक! दिराने विधवा वहिनीला मारहाण करून फाडले कपडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:22 IST2019-04-05T20:21:05+5:302019-04-05T20:22:59+5:30

नणंद व तिचा नवरा अद्याप फरार आहेत.

Shocking Brother in law stripped the woman in the rags | धक्कादायक! दिराने विधवा वहिनीला मारहाण करून फाडले कपडे 

धक्कादायक! दिराने विधवा वहिनीला मारहाण करून फाडले कपडे 

ठळक मुद्दे3 एप्रिलला त्या महिलेचे प्रमिलासोबत भांडण झाले.पीडित महिलेचा भाऊ तिथे आला व त्याने तिची सुटका केली. या प्रकरणी त्या महिलेने बनसवाडी पोलिसांत दिर आणि नणंदेविरोधात तक्रार  दाखल केली.

बंगळुरू - कम्मानहल्ली परिसरात राहणाऱ्या विधवा वहिनीला तिच्या दिराने भररस्त्यात मारहाण करून तिचे कपडे उतरवल्याची अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी त्या महिलेने बनसवाडी पोलिसांत दिर आणि नणंदेविरोधात तक्रार  दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दिराला तात्काळ अटक केली. नणंद व तिचा नवरा अद्याप फरार आहेत.

पीडित महिलेचा पती शिवकुमार यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. ती व तिची दोन मुलं तिच्या सासू सासरे व दिरासोबत बंगळुरूच्या  कम्मानहल्ली परिसरात राहताची. पतीच्या मृत्यूपासून त्या महिलेचा तिची सासू, नणंद प्रमिला सतत छळ करत होते. 3 एप्रिलला त्या महिलेचे प्रमिलासोबत भांडण झाले. त्यावेळी प्रमिलाने तिला चप्पलेने तिला मारहाण करत घरातून निघून जाण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत सांगितले. पोलिसांनी तिला गुरुवारी सकाळी येऊन तक्रार देण्यास सांगितले. दरम्यान, तिचा दिर सतीश दारातच तिची वाट पाहत उभा होता. त्यानंतर सतीश व प्रमिलाने तिला बेदम मारहाण केली आणि चाकूने तिचे कपडे फाडले. त्याचेवेळी पीडित महिलेचा भाऊ तिथे आला व त्याने तिची सुटका केली. 

Web Title: Shocking Brother in law stripped the woman in the rags