धक्कादायक! रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीची भरणी करताना आढळून आला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 18:37 IST2020-10-10T18:35:39+5:302020-10-10T18:37:28+5:30

Murder : हत्या करुन पुरल्याचा संशय

Shocking! The body was found while filling the railway canteen building | धक्कादायक! रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीची भरणी करताना आढळून आला मृतदेह

धक्कादायक! रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीची भरणी करताना आढळून आला मृतदेह

ठळक मुद्देकोणतरी अज्ञात इसमाची हत्या करुन पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करीत आहेत.  या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस तपास करीत आहेत.

कल्याण-वालधूनीनजीक रेल्वे कॅन्टीनची इमारत उभारली जात आहे. त्यासाठी पायाभरणी केली जात आहे. पायाभरणीचे काम सुरु असताना त्याठिकाणी एक मृतदेह आढळून आला आहे. हत्या करुन अज्ञात व्यक्तिला पुरण्यात आले आहे. हत्या करणा:यांचा उद्देश पुरावा नष्ट करण्याचा आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.  या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस तपास करीत आहेत.


रेल्वे कॅन्टीच्या पायाभरणीचे काम सुरु असताना आज सकाळी त्याठिकाणी माती सावरली जात होती. त्याठिकाणी एक मुडके आढळून आले. जे अर्धवट अवस्थेत होते. भडक्या प्राण्यांनी त्या मुडक्याचे लचके तोडले होते. त्याठिकाणी काम करण्यासाठी आलेले कामगारांनी ते पाहताच त्यांना मोठा ध्क्का बसला. कामगारांनी पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी महात्मा फुले पोलिसांनी धाव घेतली. माती उकरून मृतदेह बाहेर काढला. उकरुन काढलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. कोणतरी अज्ञात इसमाची हत्या करुन पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करीत आहेत.


अन्य एका घटनेत कल्याण पश्चिमेतील मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या सुजित पाटील या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तीन दिवसापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून कोयत्याने वार करुन सुजितची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी किरण भरम याला सुजितच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. सुजित व किरण एकाच परिसरात राहत होते. तीन दिवसापूर्वी त्याचा वाद झाला होता. या वादातूनचही सुजितची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Shocking! The body was found while filling the railway canteen building