धक्कादायक! रिक्षाचालकाकडून मध्यरात्री छेडछाड; तरुणीसह तिच्या दोन मित्रांना जमावाची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 09:28 IST2021-07-03T09:27:55+5:302021-07-03T09:28:22+5:30

Crime news Kalyan: कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे.

Shocking! autorickshaw driver molesting girl at midnight; mob beat up two of her friends, including her | धक्कादायक! रिक्षाचालकाकडून मध्यरात्री छेडछाड; तरुणीसह तिच्या दोन मित्रांना जमावाची मारहाण

धक्कादायक! रिक्षाचालकाकडून मध्यरात्री छेडछाड; तरुणीसह तिच्या दोन मित्रांना जमावाची मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. तरुणी रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षाचालक तिची छेड काढू लागला. याची माहिती तिने आपल्या मित्रांना दिली. तिच्या मदतीसाठी पोहोचलेल्या मित्रांसह तरुणीला रिक्षाचालक आणि गावातील काही लोकांनी पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Girl molested by riksha driver; mob beat her friend and her in Kalyan.)

   राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत. ते उल्हासनगरमध्ये राहतात. मध्यरात्री त्यांची एक मैत्रीण रिक्षाने प्रवास करत असताना चालक तिची छेडछाड करु लागला. तिने फोनवरुन याची माहिती तिच्या मित्रांना दिली. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले. मात्र या ठिकाणी आल्यावर रिक्षाचालक आणि गावातील लोकांनी या तरुणांना जोरदार मारहाण केली. तरुणीला सुद्धा  बेदम मारहाण करण्यात आली. पट्ट्याने त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत काही व्हीडिओ देखील समोर आले आहेत.

कोळसेवाडी पारिसरातील काटेमानीवली नाक्यावर भर रस्त्यात हा प्रकार घडला. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

Read in English

Web Title: Shocking! autorickshaw driver molesting girl at midnight; mob beat up two of her friends, including her