धक्कादायक! शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, माथेफिरू तरुणाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:32 IST2020-02-03T10:25:17+5:302020-02-03T10:32:26+5:30

माथेफिरू तरूणाने शिक्षिकेच्या अंगावर  पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले.

Shocking! Attempts to burn the teacher alive | धक्कादायक! शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, माथेफिरू तरुणाचा प्रताप

धक्कादायक! शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, माथेफिरू तरुणाचा प्रताप

हिंगणघाट (वर्धा) : नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका तरूण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे कृत्य एका माथेफिरू तरुणाने केल्याचे सांगण्यात येत आहे. 

माथेफिरू तरूणाने शिक्षिकेच्या अंगावर  पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यात शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. ही घटना सकाळी 7.30 वाजता नंदोरी चौकात घडली. 

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. तसेच, या प्रकरणातील प्रमुख आरोपी विकेश नगराळे (रा. दारोडा) फरार झाला आहे. तर विकेश नगराळेसोबत अन्य दोन युवक असल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी बातम्या...

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

Coronavirus News: चीनमधून ३२३ भारतीय परतले; दोन मराठी मुलांची मात्र परवड

जामिया विद्यापीठाजवळ पुन्हा गोळीबार, गेल्या चार दिवसातील तिसरी घटना

Budget 2020: नेपाळ, चीनला बजेटच्या प्रस्तावातून हादरा

Budget 2020: अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी सरकार कटिबद्ध- निर्मला सीतारामन

Web Title: Shocking! Attempts to burn the teacher alive