Shocking! attempt suicide by family in Gaziabad | धक्कादायक! एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना
धक्कादायक! एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना

ठळक मुद्देव्यवसायातील नुकसान आणि जवळच्या व्यक्तींचा विश्वासघात झाल्यानंतर कुटुंबातील प्रमुख गुलशन वासुदेव यांनी पत्नी आणि व्यावसायिकाच्या साथीदारासह पहिला मुलगा ‌ऋतिक आणि मुलगी किट्टूची हत्या केली. भिंतीवर आत्महत्या करत असल्याचं लिहून एका कुटुंबातील सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली.

गाजियाबाद - उत्तर प्रदेशात अंगावर काटा आणणारी हृदयद्रावक एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिंतीवर आत्महत्या करत असल्याचं लिहून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे कुटुंबातील सगळ्यांनी आत्महत्या केल्यामुळे अंत्यसंस्काराचा खर्च कोणाला होऊ नये म्हणून भिंतीवर ५०० - ५०० च्या नोटा चिटकवल्या आणि त्याखाली अंत्यसंस्काराच खर्च असं लिहलं आहे. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. 

व्यवसायातील नुकसान आणि जवळच्या व्यक्तींचा विश्वासघात झाल्यानंतर कुटुंबातील प्रमुख गुलशन वासुदेव यांनी पत्नी आणि व्यावसायिकाच्या साथीदारासह पहिला मुलगा ‌ऋतिक आणि मुलगी किट्टूची हत्या केली. नंतर तिघांनीही ८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. भिंतीवर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये राकेश वर्मा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे. जो मृत गुलशनचा मेहुणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. राकेश वर्मा कुटुंबाच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं भिंतीवर लिहिण्यात आलेल्या मेसेजमध्ये आहे. स्वत: ला मृताचा भाऊ असल्याचं वर्णन करणाऱ्या हरीशने गुलशनचा मेहुणा राकेश वर्मा याने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला. जीन्सच्या धंद्यात त्याचे दोन कोटींचे नुकसान झाले. ही फसवणूक फक्त राकेश वर्मा याने केली आहे असं सुसाईट नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे.

Web Title: Shocking! attempt suicide by family in Gaziabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.