धक्कादायक! प्रेयसीशी वारंवार भांडणे पडले महागात; मित्राने केले गळयावर कटरने वार ; भोसरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 17:35 IST2021-01-04T17:34:44+5:302021-01-04T17:35:03+5:30

आरोपी किरण आणि जखमी झालेला अभिषेक हे दोघे मित्र आहेत.

Shocking! Arguing with a loved one is expensive; A friend stabbed him in the neck; incident in Bhosari | धक्कादायक! प्रेयसीशी वारंवार भांडणे पडले महागात; मित्राने केले गळयावर कटरने वार ; भोसरीतील घटना

धक्कादायक! प्रेयसीशी वारंवार भांडणे पडले महागात; मित्राने केले गळयावर कटरने वार ; भोसरीतील घटना

पिंपरी : मित्राचे त्याच्या प्रेयसीशी छोटे छोट्या गोष्टींवरून वाद सुरु होत होते. त्याच कारणावरून रागाच्या भरात दुचाकीवरून जात असताना मित्राच्याच गळ्यावर कटरने वार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यात घटनेत मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे टेल्को रस्त्यावर महावितरणच्या कार्यालयासमोर घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. 

अभिषेक उर्फ आकाश मधूकर कांबळे (वय २६), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर किरण शिवाजी थोरात (वय २३, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम मधूकर कांबळे (वय २०, रा. बालाजीनगर झोपडपट्टी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी किरण आणि जखमी झालेला अभिषेक हे दोघे मित्र आहेत. अभिषेक याचे एका मुलीशी प्रेमसंबंध आहेत. त्या मुलीसोबत त्याचे वारंवार वाद होत. त्यामुळे आरोपी किरण याला त्याचा राग आला. आरोपी किरण आणि अभिषेक हे दोघे गुरुवारी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपी याने अभिषेक याच्या गळ्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: Shocking! Arguing with a loved one is expensive; A friend stabbed him in the neck; incident in Bhosari