शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पाणी सांगून सिद्यार्थ्याला शिक्षकाने पाजली दारू, बेशुद्ध अवस्थेत केलं रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 21:55 IST

Crime News : या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःकडे असलेली दारू पाजली. हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल, असं म्हणत त्याला ते पिण्याची जबरदस्ती केल्याची माहिती उघड झाली आहे.

सूरजपूर - छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकाने  आपल्या वर्गातील विद्यार्थ्याला पाणी असल्याचं सांगत जबरदस्तीनं दारू  पाजल्याचा गंभीर घटना घडली आहे.  याचा परिणाम विद्यार्थ्याच्या तब्येतीवर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला स्वतःकडे असलेली दारू पाजली. हे पाणीच आहे आणि तुला प्यावंच लागेल, असं म्हणत त्याला ते पिण्याची जबरदस्ती केल्याची माहिती उघड झाली आहे. दारू प्यायल्यामुळे विद्यार्थी बेशुद्ध पडला. हरिलाल कुर्रे नावाचा हा शिक्षक स्वतः वर्गात दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेतच तो वर्गावर आला आणि विद्यार्थ्यांना काहीही बोलू लागला. शिक्षकाने दारू प्यायली आहे, हे विद्यार्थ्यांनाही समजलं आणि ते त्याची गंमत पाहत होते. 

याच दरम्यान शिक्षकाने त्याच्या वर्गातील एका मुलाला उभं केलं आणि जवळ बोलावलं. त्याला स्वतःकडची दारू पाणी म्हणून पिण्यास सांगितली. त्याने पिण्यास सुरुवातीला नकार दिला. त्यावर हे पाणीच आहे आणि ते तू प्यायलंच पाहिजेस, अशी सक्ती करत त्याच्या तोंडात अक्षरशः दारू ओतली.  

या प्रकाराने विद्यार्थी बेशुद्ध पडला आणि वर्गात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी बेशुद्ध झाल्याची बातमी शाळेत वाऱ्यासारखी पसरली आणि शाळेतील इतर शिक्षकांनी त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. काही वेळाच्या उपचारानंतर विद्यार्थ्याला शुद्ध आली आणि त्याची तब्येत धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या प्रकारामुळे सर्वांनाच जबर धक्का बसला. शिक्षकावर शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली असून पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकsuspensionनिलंबन