धक्कादायक! महिलेवर गँगरेप, सासऱ्याची विचारपूस करण्याच्या बहाण्याने नराधम घुसले घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 21:15 IST2022-02-04T21:15:18+5:302022-02-04T21:15:43+5:30
Gangrape Case : महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले. महिलेवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे सांगण्यात येत आहे.

धक्कादायक! महिलेवर गँगरेप, सासऱ्याची विचारपूस करण्याच्या बहाण्याने नराधम घुसले घरात
अलवरमधील बन्सूर परिसरात एका विवाहितेसोबत सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिला शेजारच्या घराजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले. महिलेवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीडितेने सांगितले की, काही लोक घरात आले आणि सासऱ्यांची चौकशी करू लागले. त्यावर ती म्हणाली की, घरी कोणी नाही, त्यानंतर ते लोकं जबरदस्तीने घरात घुसले. तिला ड्रग्ज देण्यात आले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली, त्यानंतर सर्वांनी तिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणली. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश कुमार सांगतात की, एका विवाहित महिलेसोबत सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे.
पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत
राजस्थानमध्ये अलीकडे बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांविरोधातील कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याला ते गांभीर्याने सामोरे जातील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.