धक्कादायक! पाच वर्षे चिमुरडीवर सतरा वर्षाच्या मुलाने बाथरूममध्ये केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 13:33 IST2023-01-12T13:32:16+5:302023-01-12T13:33:25+5:30

पीडित चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ११ जानेवारी रोजी एक वाजण्याच्या सुमारास घरातील फरशी पुसण्याचे काम करीत असताना पीडित चिमुरडी (वय चार वर्षे नऊ महिने) व तिची मैत्रीण अंगणात खेळत होते.

Shocking! A 17-year-old boy molested a girl for five years in a bathroom in Solapur | धक्कादायक! पाच वर्षे चिमुरडीवर सतरा वर्षाच्या मुलाने बाथरूममध्ये केला अत्याचार

धक्कादायक! पाच वर्षे चिमुरडीवर सतरा वर्षाच्या मुलाने बाथरूममध्ये केला अत्याचार

- विठ्ठल खेळगी

सोलापूर/कुसळंब : एका पाच वर्षे चिमुरडीवर एका १७ वर्षीय मुलाने बाथरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना ११ जानेवारी रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

पीडित चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ११ जानेवारी रोजी एक वाजण्याच्या सुमारास घरातील फरशी पुसण्याचे काम करीत असताना पीडित चिमुरडी (वय चार वर्षे नऊ महिने) व तिची मैत्रीण अंगणात खेळत होते. तेव्हा पीडित चिमुरडीला एका मुलाने चल आपण भाजीपाला आणू असे म्हणून तिला शेजारी असलेल्या बाथरूमकडे घेऊन गेला व तिच्या मैत्रिणीला बाहेर उभा करून बाथरूममध्ये तिच्यावर अत्याचार करून तो तिथून निघून गेला. त्यावेळी ती चिमुरडी ते तिथेच रडत होती. 

त्यावेळी तिची मैत्री तिच्या आईकडे रडत गेली व तुमच्या मुलीस काय झाले ते बघा, असे सांगितले. तेव्हा झालेला प्रकार आपल्या आईस पीडित चिमुरडीने सांगितला. त्यानंतर चिमुरडीच्या आईने आपल्या पतीला झालेला प्रकार सांगितला व त्यांनी लागलीच पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. याबाबत चिमुरडीच्या आईने बार्शी तालुका पोलिसात धाव घेऊन संबंधित मुलाविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची रवानगी सोलापूर बालसुधारगृहात केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हे करीत आहे.
 

Web Title: Shocking! A 17-year-old boy molested a girl for five years in a bathroom in Solapur