धक्कादायक! ९ वर्षाच्या मुलाचा साडे चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 18:53 IST2022-04-17T18:53:00+5:302022-04-17T18:53:43+5:30

Sexual Abuse : मुलीच्या पोटात दुखत असल्याने खरे कारण उघड झाल्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. 

Shocking! 9-year-old boy sexually abuses 4-and-a-half-year-old girl | धक्कादायक! ९ वर्षाच्या मुलाचा साडे चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! ९ वर्षाच्या मुलाचा साडे चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरात राहणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाने साडे चार वर्षाच्या मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरा मागे नेऊन अत्याचार केला. मुलीच्या पोटात दुखत असल्याने खरे कारण उघड झाल्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात ९ वर्षाचा मुलगा व साडे चार वर्षाची मुलगी शेजारी राहतात. ३ एप्रिल रोजी मुलगी व मुलगासोबत खेळत असतांना मुलाने मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरा मागे नेऊन अत्याचार केला. काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखत असल्याने, मुलीच्या आईने डॉक्टरकडे नेल्यावर खरे कारण पुढे आले. मुलीच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर मुलावर बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. तर मुलाला बाल न्यायालयात भिवंडी येथे नेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Shocking! 9-year-old boy sexually abuses 4-and-a-half-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.