शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 23:29 IST

UP Crime News: जंगलात दृष्कृत्य करत असताना अचानक मुलगा घाबरला... नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली. कोखराज पोलीस स्टेशन परिसरात, त्याच गावातील एका अल्पवयीन मुलाने ८ वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना १४ तारखेला संध्याकाळी घडली, जेव्हा मुलगी रेल्वे स्टेशनजवळ शेळ्या चरत होती. चॉकलेटचे आमिष दाखवून एका मुलाने मुलीला आपल्यासोबत दुकानात येण्यास सांगितले.

मुलीसोबत जवळच इतरही काही मुले होती. त्यामुळे तो मुलगा दुकानाच्या बहाण्याने तिला जंगलात घेऊन गेला आणि त्याने दृष्कृत्य केले. जेव्हा मुलीला वेदना होऊ लागल्या आणि रक्त येऊ लागले, तेव्हा आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. चिमुरडी मुलगी कशीबशी रडत घरी पोहोचली आणि कुटुंबाला तिच्यावरील अत्याचाराची कहाणी सांगितली. हे ऐकून कुटुंबाला धक्का बसला. कुटुंबाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

कोखराज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच, कुटुंबाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी आरोपी अल्पवयीन असल्याची पुष्टी केली आहे. मुलीचा जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. या घटनेमुळे परिसरातील स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

एसपी राजेश कुमार म्हणाले की, आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल एका अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने मुलीला चॉकलेट टॉफी देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. इतर आवश्यक कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशsexual harassmentलैंगिक छळ