धक्कादायक! २ वर्षाच्या चिमुकलीचे अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 20:51 IST2021-04-09T20:51:18+5:302021-04-09T20:51:55+5:30
Rape : पीडित मुलीवर आता दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायक! २ वर्षाच्या चिमुकलीचे अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण
ठळक मुद्देलैंगिक शोषण करणाऱ्या विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे २ वर्षीय चिमुकलीवर १४ वर्षाच्या मुलाने लैंगिक शोषण केले. पीडित मुलीवर आता दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, मुलाने तिच्याबरोबर टेरेसवर खेळत असताना तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडली तेव्हा चिमुकल्याची आई खालीच होती. मुलीची आई आणि आजोबांनी तिचा आरडाओरडा ऐकल्यानंतर ते गच्चीवर धावत आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मुलगा तेथून पळून गेला. लैंगिक शोषण करणाऱ्या विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.