डेहराडून - उत्तराखंडमधील मिशनरी शाळेत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका 12 वर्षीय विद्यार्थाची त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या दोन सिनियर विद्यार्थ्यांनी क्रिकेट बॅटने प्रहार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर शाळेने हा प्रकार लपविण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या परिसरातच पुरल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील तीन कर्मचाऱ्यांना आणि दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
धक्कादायक ! बिस्कीट चोरल्याने १२ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या; शाळेतच पुरला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:21 IST