आमदारावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवक पिता पुत्राला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 23:38 IST2019-03-05T23:37:17+5:302019-03-05T23:38:56+5:30

एका कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती.

Shiv Sena corporator's father, son, was arrested for attacking the MLA | आमदारावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवक पिता पुत्राला बेड्या

आमदारावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवक पिता पुत्राला बेड्या

नवी मुंबई - नगरसेवक मनोहर मढवी व करण मढवी यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ऐरोली येथे कार्यक्रमात महापौर व आमदार यांच्यावर हल्ला प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात आतापर्यंत 12 जणांना अटक झालेली आहे. पालिकेच्या कामाच्या उद्घाटनावेळी श्रेय वादातून दोन गटात हाणामारी झाली होती. एका कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. या राड्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर कारची तोडफोड केली. ऐरोलीत महापालिकेचं सभागृह बांधण्यात आलं. त्या सभागृहाच्या उद्घाटनचा कार्यक्रम होता. या उद्घाटनाचं श्रेय घेण्यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. त्यात संदीप नाईक यांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली होती.

 

Web Title: Shiv Sena corporator's father, son, was arrested for attacking the MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.