शिवसेना नगरसेवकाने संगणक देऊन व्यक्त केली पोलिसांबद्दल कृतज्ञता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 17:54 IST2021-10-01T17:53:54+5:302021-10-01T17:54:56+5:30
Police News : कोविड १९ च्या भयंकर संकटात देखिल आपल्याला पोलिस बांधवांनी सर्वतोपरी मदत केली.

शिवसेना नगरसेवकाने संगणक देऊन व्यक्त केली पोलिसांबद्दल कृतज्ञता
मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीची अर्थात आपल्या मुंबई शहराची अहोरात्र सुरक्षा करणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. ऊन, पाऊस असो अथवा कोणतेही सण उत्सव असोत पोलीस आपले काम चोख करत असतात म्हणून आपण या उत्सवांचा आनंद घेऊ शकतो. कोविड १९ च्या भयंकर संकटात देखिल आपल्याला पोलिस बांधवांनी सर्वतोपरी मदत केली.
येथील पोलिसांचे कार्य सुखकर करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून दहिसर पोलीस ठाण्याला प्रभाग क्रमांक ३ चे शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी स्वखर्चाने लॅपटॉप प्रदान केले. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात तर त्यांचे काम सुखकर करण्यासाठी आम्ही एवढं तर नक्की करू शकतो." असे ब्रीद म्हणाले.
या प्रसंगी स्वतः ब्रीद यांनी हे लॅपटॉप दहिसर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी पोलीस निरीक्षक संजय मराठे तसेच इतर पोलिस अधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.