शीना बोरा जिवंत नाही, सीबीआयकडे पुरावे; आराेपी इंद्राणी मुखर्जीचा दावा फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 06:07 AM2022-02-20T06:07:08+5:302022-02-20T06:09:03+5:30

शीना बोरा जिवंत असून, तिचा शोध घेण्यात यावा, असा अर्ज शीनाची आई व शीनाच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने विशेष सीबीआय न्यायालयात केला हो

Sheena Bora not alive, evidence before CBI; RAP rejected Indrani Mukherjee's claim | शीना बोरा जिवंत नाही, सीबीआयकडे पुरावे; आराेपी इंद्राणी मुखर्जीचा दावा फेटाळला 

शीना बोरा जिवंत नाही, सीबीआयकडे पुरावे; आराेपी इंद्राणी मुखर्जीचा दावा फेटाळला 

Next

मुंबई : शीना बोराचा खरोखरच मृत्यू झाला आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत, असे सीबीआयने विशेष न्यायालयाला शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा दावा फेटाळताना सांगितले.
शीना बोरा जिवंत असून, तिचा शोध घेण्यात यावा, असा अर्ज शीनाची आई व शीनाच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने विशेष सीबीआय न्यायालयात केला होता. या अर्जावर सीबीआयने उत्तर दाखल केले. 

इंद्राणी मुखर्जीने केलेल्या अर्जानुसार, एका महिला पोलीस निरीक्षकाने शीना हिला काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमध्ये पाहिले आणि तसा जबाब ती पोलिसांकडे देण्यास तयार आहे. इंद्राणीने सीबीआयच्या सहसंचालकांना २७ नोव्हेंबर २०२१ रोजी  लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आणि आता माझी सहकैदी मुंबई पोलीस निरीक्षक आशा कोर्के ही गेल्यावर्षी जून महिन्यात शीना बोराला श्रीनगर येथे डल लेकजवळ भेटली होती. 

तिच्या या पत्रावर सीबीआय सहसंचालकांनी काहीही उत्तर न दिल्याने तिने न्यायालयात अर्ज केला. शीनाने न्यायालयात केलेल्या अर्जानुसार, कोर्के शीनाला अचानक भेटली. शीनाला पाहून कोर्केने तिला ती जिवंत असल्याने सगळ्यांसमोर येऊन तिच्या आईला मदत करण्याची सूचना केली.  तिच्याच हत्येप्रकरणी तिची आई कारागृहात असल्याने तिला सोडविण्याचा सल्ला कोेर्केने शीनाला दिला. मात्र, तिने तो सल्ला नाकारला. मला पुन्हा जुने आयुष्य जगायचे नाही, असे म्हणून ती एका पुरुषाच्या बाईकवरून निघून गेली.

सीबीआयच्या संहसंचालकांना पत्र
सीबीआयच्या सहसंचालकांना २७ नोव्हेंबर २०२१ रोजी  लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आणि आता माझी सहकैदी मुंबई पोलीस निरीक्षक आशा कोर्के ही गेल्यावर्षी जून महिन्यात शीना बोराला श्रीनगर येथे डल लेकजवळ भेटली होती. 

तिच्या या पत्रावर सीबीआय सहसंचालकांनी काहीही उत्तर न दिल्याने तिने न्यायालयात अर्ज केला. शीनाने न्यायालयात केलेल्या अर्जानुसार, कोर्के शीनाला अचानक भेटली. शीनाला पाहून कोर्केने तिला ती जिवंत असल्याने सगळ्यांसमोर येऊन तिच्या आईला मदत करण्याची सूचना केली. तिच्याच हत्येप्रकरणी तिची आई कारागृहात असल्याने तिला सोडविण्याचा सल्ला कोेर्केने शीनाला दिला. मात्र, तिने तो सल्ला नाकारला. मला पुन्हा जुने आयुष्य जगायचे नाही, असे म्हणून ती एका पुरुषाच्या बाईकवरून निघून गेली. 

शीनाच्या हत्येनंतर तीन वर्षांनी म्हणजेच २०१५मध्ये तिच्या हत्येची बाब उजेडात आली. त्यानंतर सर्वात आधी शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली. त्यानंतर तिच्या दोन पतींना अटक करण्यात आली.

सापळ्याचे डीएनए मॅच 
तपास यंत्रणेने जमवलेल्या पुराव्यांवरून शीना बोराचा मृत्यू झाल्याचेच सिद्ध होते. रायगडच्या जंगलातून सापडलेल्या सापळ्याचे डीएनए मॅच झाले आहेत. त्यावरून शीना बोराचा मृत्यू २०१२मध्ये झाल्याचे सिद्ध होते, असे सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात म्हणत सीबीआयने इंद्राणीचा अर्ज फेटाळण्याची विनंती केली.  

Web Title: Sheena Bora not alive, evidence before CBI; RAP rejected Indrani Mukherjee's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.