आईच्या प्रियकराकडे सापडले तिला स्वत:चे विवस्त्र फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 13:01 IST2017-11-01T12:26:30+5:302017-11-01T13:01:31+5:30
आपल्या आईच्या प्रियकराची बाहेर अफेअर आहेत, असा संशय असल्याने ती त्याच्यावर पाळत ठेऊन होती.

आईच्या प्रियकराकडे सापडले तिला स्वत:चे विवस्त्र फोटो
फ्लोरिडा - भिंतीच्या सॉकेटमध्ये सिक्रेट कॅमेरा ठेवून एका माणसाने आपल्याच प्रेयसीच्या मुलीचे नग्न फोटो काढल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीनेच हा सर्व प्रकार उघडकीस आणला असून तिने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मॅथ्यू बोरडॉक्स (४८) असे या नराधमाचे नाव असून तो आणि त्याची प्रेयसी गेल्या सात वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत होते. पीडित मुलीने बॉरडॉक्सचा कॉम्प्युटर तपासला असता त्यात हिडन नावाचा एक फोल्डर तिला दिसला. उत्सुकतेने तिने हा फोल्डर पाहिला असता तिला धक्काच बसला. आपले नग्नावस्थेतील एवढे फोटो याच्याकडे कसे आले आणि ते त्याने केव्हा व कसे शूट केले असतील या चिंतेत ती पडली.
पीडित मुलीने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, तिला वाटत होतं की बोरडॉक्सचे बाहेरही अफेअर आहे. त्याचा शोध लावण्यासाठी तिने त्याचा कॉम्प्युटर तपासला. त्या कॉम्प्युटरमध्ये प्रत्येकाच्या नावाची वेगळी फोल्डर्स तिला दिसली. त्या प्रत्येक फोल्डरला पासवर्ड होता. मात्र बोरडॉक्सच्या फोल्डरला पासवर्ड नव्हता. त्यामुळे तिने तो फोल्डर चेक केला. त्यात तिला हिडन नावाचा फोल्डर सापडला. त्यामुळे तिने मुद्दाम तो फोल्डर चेक केला. त्या फोल्डरमधील हा स्टफ पाहून तिलाच धक्का बसल्याचं ती सांगते.
याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता पीडितेच्या बाथरूममध्ये हिडन कॅमेरासोबत एसी अॅडॉप्टर आणि मेमरी कार्ड सापडलं. त्यामुळे फोटो थेट कॉम्प्यूटरमध्ये सेव्ह होत होते. पोलिसांनी बोरडॉक्सला अटक केली असून त्याला १० हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तंत्रज्ञान जसजसं प्रगत होत आहे तसतसं गुन्ह्यांमध्ये त्याचा वापर करण्याचं प्रमाणही वाढत आहे. सायबर क्राईम आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हे करण्याचा प्रमाण जगभरातील सर्वच देशात भरपुर आहे.
सौजन्य - www.dailymail.co.uk