नवी दिल्ली - ६ फेब्रुवारीला गार्गी कॉलेजच्या फेस्टदरम्यान बाहेरून कॉलेजात घुसलेल्या टोळक्याने तरूणींसोबत घडलेली छेडछाडीची घटना ताजी असताना दिल्लीत तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीने महिलेला आपले गुप्तांग दाखवून अश्लिल इशारे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दिल्ली मेट्रोच्या येल्लो लाईनवर घडला आहे. तरूणीने स्वतः ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे.
लज्जास्पद! तरुणीला मेट्रोमध्ये भामट्याने दाखवले गुप्तांग काढून अन् केले अश्लील इशारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 18:52 IST
तरूणीने स्वतः ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे.
लज्जास्पद! तरुणीला मेट्रोमध्ये भामट्याने दाखवले गुप्तांग काढून अन् केले अश्लील इशारे
ठळक मुद्देपीडित तरुणीने आपल्या ट्विटर हँडलवरून डीएमआरसी यांना ट्विट टॅग करून ग्रे जॅकेट आणि पुढे बॅग घेतलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. गुरूवारी सकाळी ९.३० मिनिटांनी तिने घिटोरनी मेट्रो स्टेशनवर तक्रार दाखल केली.