लाजिरवाणे! इंदूरमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मग केला व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:17 IST2022-02-07T18:17:06+5:302022-02-07T18:17:58+5:30
Rape Case : आरोपीच्या या कृत्याचा व्हिडीओ कोणीतरी व्हायरल केला, तर पोलिसांनी कारवाई करत आरोपी रवीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

लाजिरवाणे! इंदूरमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मग केला व्हिडिओ व्हायरल
इंदूर: इंदूरमध्ये एका तरुणाने क्रौर्याची परिसीमा ओलांडली आणि आझाद नगर भागात सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपीच्या या कृत्याचा व्हिडीओ कोणीतरी व्हायरल केला, तर पोलिसांनी कारवाई करत आरोपी रवीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
वास्तविक, मुलगी इंदूरच्या मुसाखेडी भागातील शांतीनगरमध्ये राहते. तिला आई नाही. आजी आणि वडिलांसोबत ती राहते. आजी कामावर गेली होती आणि वडीलही बाहेर गेले होते. दरम्यान, आरोपी रवीने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा करताच तिचे तोंड दाबले.
कोणीतरी मागून व्हिडिओ बनवला
दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने व्हिडिओ बनवला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी परिसरात दारूचे वितरण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आजी आणि वडिलांच्या अनुपस्थितीत तो अनेकदा मुलीच्या घरी जात असे.
मुंबई विमानतळावर चार किलो सोने जप्त, एआययूची करवाई
पंजाब निवडणुकीतील मतदानापूर्वी राम रहिमला २१ दिवसांसाठी दिली जेलमधून सुट्टी
व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाई केली जाईल
पोलिस आरोपीच्या घराचीही माहिती गोळा करत आहेत. एका निरपराधवर बलात्काराच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही समोर येत आहे. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.