लज्जास्पद! अल्पवयीन मुलीवर नराधमांचा सामूहिक बलात्कार अन् व्हिडीओ शूट करून केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 14:59 IST2019-09-24T14:56:21+5:302019-09-24T14:59:55+5:30

अन्य दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Shame! Gangrape on 16 yrs old girl and shoot video in mobile, viral widely | लज्जास्पद! अल्पवयीन मुलीवर नराधमांचा सामूहिक बलात्कार अन् व्हिडीओ शूट करून केला व्हायरल

लज्जास्पद! अल्पवयीन मुलीवर नराधमांचा सामूहिक बलात्कार अन् व्हिडीओ शूट करून केला व्हायरल

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील कौशंबी जिल्ह्यात ही धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली आहे.पळ काढताना ती शेतात पडली आणि तिघांनी दुष्कृत्य केल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. तीन नराधमांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार तर केलाच एवढ्यावरच न थांबता त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. त्यामुळे एकाच खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील कौशाxबी जिल्ह्यात ही धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशाची राजधानी असलेल्या लखनऊपासून १९० किमीच्या अंतरावर ही लज्जास्पद घटना घडली. आरोपींपैकी एकजण गावकऱ्यांच्या तावडीत सापडला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या आरोपीचं नाव मोहम्मद नाझिम (२०) असं आहे. इतर दोन आरोपी फरार झाले आहेत.पीडित तरुणी शेजारच्या गावात गुरांसाठी चारा गोळा करण्यासाठी गेली असताना तिन्ही आरोपींनी तिच्यावर हल्ला केला. नराधमांनी जबरदस्ती करत एका निर्जनस्थळी तिला नेलं आणि सामूहिक बलात्कार केला. एका फळांच्या बागेत असताना आरोपींनी पाठीमागून पीडित तरुणीवर हल्ला केला आणि ओढत नेलं. पळ काढताना ती शेतात पडली आणि तिघांनी दुष्कृत्य केल्याची माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली. अन्य दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, समाजाला लाजवेल अशा या कृत्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. 

Web Title: Shame! Gangrape on 16 yrs old girl and shoot video in mobile, viral widely