लज्जास्पद! दिव्यांग मुलीची अब्रू लुटली; पीडितेला बोलू, ऐकू येत नसल्याने आरोपीची ओळख पटवण्यासाठी बोलावले तज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 22:02 IST2021-08-16T22:01:22+5:302021-08-16T22:02:22+5:30
Rape Case : पीडित मुलगी वाईट अवस्थेत घरी पोहोचली तेव्हा कुटुंबातील लोकांच्या अंगावर काटा आला.

लज्जास्पद! दिव्यांग मुलीची अब्रू लुटली; पीडितेला बोलू, ऐकू येत नसल्याने आरोपीची ओळख पटवण्यासाठी बोलावले तज्ञ
राजस्थानच्या अलवरमध्ये घराबाहेर पडलेल्या एका दिव्यांग अल्पवयीन मुलीवर कोणी बलात्कार केला याचा पत्ता लागत नव्हता. पीडित मुलगी वाईट अवस्थेत घरी पोहोचली तेव्हा कुटुंबातील लोकांच्या अंगावर काटा आला. ती खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिचे शब्द आणि बोलणं कोणाला समजू शकलं नाही.
नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दिव्यांग मुलीची भाषा समजून घेण्यासाठी तज्ञांचा वापर केला जात आहे.
नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठले
हे प्रकरण अलवर जिल्ह्यातील बंसूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे 14 वर्षांच्या दिव्यांग मुलीवर कोणीतरी बलात्कार केला. जेव्हा अल्पवयीन मुलगी अतिशय लाजिरवाण्या स्थितीत घरी पोहोचली, तेव्हा तिची अवस्था पाहून कुटुंबातील सदस्य आश्चर्यचकित झाले. कुटुंबीयांनी पीडित मुलीला पोलीस ठाण्यात नेले, जिथे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात मुलीचे वैद्यकीय अहवाल काढण्यात आले.
यानंतर, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध पॉक्सो कायदा, बलात्कार आणि एससी / एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अल्पवयीन मुलीसोबत हा क्रूर गुन्हा कोणी केला याचा पोलिसांना अद्याप शोध लागलेला नाही.
तपास डीएसपीकडे सोपवला
या घटनेनंतर अलवरचे पोलीस अधीक्षक तेजस्वानी गौतम पीडित मुलीला भेटण्यासाठी पोहोचले. मात्र, पीडिता काय म्हणत आहे हे पोलिस अधीक्षकांनाही समजू शकले नाही. त्याने सांगितले की, अल्पवयीन मुलगी दिव्यांग आहे, तिला नीट बोलता येत नाही आणि ऐकता येत नाही, यामुळे ती स्पष्टपणे काही सांगू शकत नाही. पीडित मुलीचे स्टेटमेंट घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास डीएसपी सुरेंद्र सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.