लज्जास्पद! गावातील एका तरुणाने केला सात वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडितेला केले रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 21:56 IST2022-07-13T21:54:21+5:302022-07-13T21:56:16+5:30

Rape Case : मिळालेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी गावातील एका तरुणाने चिमुकलीवर बलात्कार केला.

Shame! A young man from the village raped a seven-year-old girl and admitted the victim to the hospital | लज्जास्पद! गावातील एका तरुणाने केला सात वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडितेला केले रुग्णालयात दाखल

लज्जास्पद! गावातील एका तरुणाने केला सात वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडितेला केले रुग्णालयात दाखल

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 8 जुलै रोजी गावातील एका तरुणाने चिमुकलीवर बलात्कार केला. मुलगी घरी पोहोचल्यावर घरच्यांना काहीच समजले नाही. त्यांना वाटले की, मुलगी दुखापत झाली आहे. तिच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी शेजारील जिल्ह्यातील आंबेडकरनगर गाठले. जिथे डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती दिली. हे ऐकून कुटुंबीयांना धक्काच बसला. डॉक्टरांनी कुटुंबीयांना पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. त्यावेळी कुटुंबीयांनी पेच निर्माण झाल्यामुळे कारवाई केली नाही.

दरम्यान, मुलीची प्रकृती खालावली होती. मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक सोमेन बर्मा याच परिसरात गस्त घालत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी मुलीला घेऊन त्यांना गाठून सर्व प्रकार सांगितला. तत्काळ कारवाई करत एसपींनी एक टीम तयार करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

पोलिसांनी केलेल्या तपासात व तरुणीची चौकशी केल्यानंतर गावातील तरुणाने तिला मासेमारीच्या बहाण्याने तलावाच्या किनाऱ्यावर नेल्याचे निष्पन्न झाले. तिथे तिच्यावर बलात्कार झाला. मुलीची प्रकृती बिघडल्याने तरुण तिथून पळून गेली. आरोपीविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

Web Title: Shame! A young man from the village raped a seven-year-old girl and admitted the victim to the hospital