"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:45 IST2025-08-28T12:44:49+5:302025-08-28T12:45:22+5:30
कर्जात अडकल्यानंतर एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं. भावांनी आणि मित्रांनी साथ दिली नाही. फक्त विश्वासघात झाला.

"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
यूपीच्या शाहजहांपूर जिल्ह्यात कर्जात अडकल्यानंतर एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं. भावांनी आणि मित्रांनी साथ दिली नाही. फक्त विश्वासघात झाला. त्यामुळे एका व्यावसायिकाने पत्नी आणि ३ वर्षांच्या निष्पाप मुलासह आपलं जीवन संपवलं. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं. शाहजहांपूरच्या रोजा पोलीस स्टेशन परिसरातील दुर्गा एन्क्लेव्ह कॉलनीत ही घटना घडली.
व्यावसायिक सचिन ग्रोव्हर त्याची पत्नी शिवांगी आणि निष्पाप मुलगा फतेहसह राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सचिनने त्याच्या व्यवसायासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. त्याला या कर्जावर सरकारकडून मोठी सबसिडी मिळणार होती, पण येथूनच त्याचा त्रास सुरू झाला. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी सबसिडी देण्यासाठी २५ लाख रुपयांची लाच मागत होते.
सचिनने आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून ३३ पानांची सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये सचिनने आपली व्यथा मांडली. एसपी राजेश द्विवेदी म्हणाले की, सुसाईड नोटच्या आधारे तपास सुरू आहे. पती-पत्नीने मुलासह आत्महत्या केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
सचिनने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, "जोपर्यंत हे पत्र कोणाला मिळेल तोपर्यंत मी सचिन ग्रोव्हर, माझी पत्नी शिवांगी, माझा मुलगा फतेह, माझं आयुष्य, माझं जग, हे सर्व काही संपून जाईल. आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं कारण बरेलीमध्ये व्यवसाय सुरू करणं होतं. लॉकडाऊन दरम्यान व्यवसायात मोठं नुकसान झालं आणि कर्जाचा भार वाढतच गेला."
"माझी फॅक्ट्री, माझ्या सासरच्यांचं घर आणि त्यांचे दागिने सर्व गहाण ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर माझे सासरे, मेहुणा आणि माझ्या पत्नीने मला आर्थिक आणि नैतिक आधार देऊन या तणावातून बाहेर काढलं. पण माझ्या स्वतःच्या कुटुंबाने मला अजिबात पाठिंबा दिला नाही." सचिनने आपल्या सुसाईड नोटमध्ये काही लोकांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.